शहरात सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल - अभिषेक बारणे ......... चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (STP)भेट
Apr 25 2026
43
शहरात सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल - अभिषेक बारणे
चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (STP)भेट
पिंपरी, ता. २५ - ''नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करुन देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. असल्याचे अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले. शहराचा होणारा विस्तार पाहता आगामी काळात सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन चिखली येथील प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर आणि पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प राबविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.'' असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.
शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी अभिषेक बारणे यांनी चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (STP)भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. चिखली परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सांडपाण्याचे शुद्धीकरण कोणत्या स्तरावर केले जाते आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा प्रभावी पुनर्वापर कसा करता येईल, यावर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शहरातील जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध तांत्रिक उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी व्यवस्थापकांना सूचना केल्या. पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर करून नैसर्गिक स्त्रोतांवरील ताण कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.