news
clock
आंबा देण्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, काळेवाडीतील घटना, आरोपी अटकेत

आंबा देण्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, काळेवाडीतील घटना, आरोपी अटकेत

आंबा देण्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, काळेवाडीतील घटना, आरोपी अटकेत

पिंपरी, ता. १५ - काळेवाडी येथे अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवार (दि.१३) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी विजय भोसले (वय ४७,रा. काळेवाडी) याला अटक केली आहे. या घृणास्पद घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. आरोपीवर लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  

याबाबत, पिडीत बालिकेच्या आईने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवून तिला जवळच्या खोलीत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही वेळाने चिमुरडी अस्वस्थ दिसून आल्याने तिच्या आईला संशय आला. चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळेवाडी पोलिस तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories