चिंचवड पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांना बजावली नोटिस
पिंपरी, ता. ९ - पोलिसांनी शुक्रवारी (ता. ८) वाल्हेकरवाडी रोड -चिंचवड येथे चिंचवड जुगार अडड्यावर छापा टाकून ५ जणांवर कारवाई केली आहे. आरोपींना नोटिस बजावली असून त्यांच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाल्हेकरवाडी रोड -चिंचवड येथे पवना नदीच्याकाठी मोकळया जागेत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. आरोपी शाहनवाज नसिमुद्दीन अन्सारी (वय ३० वर्षे, फर्निचर व्यवसाय, रा. खडकी), अरुण शिवनंदन सिंग (वय ४६ वर्षे, व्यवसाय - भाजीपाला, रा. बोपोडी), जमीर मुज्जमल शेख (वय २० वर्षे, भंगार व्यवसाय, रा. चिंचवड), अशोक दयाराम पंजवाणी (वय ५० वर्षे, प्लास्टिक मटेरीयल सप्लायर, रा. शगुन चौक, पिंपरी) व मोहमद इब्रार मोहमद सिराज (वय ४२ वर्षे, मालिशष रा. हडपसर) हे तिथे तीन पत्ती जुगार खेळत होते. त्यांच्याकडे रोख रक्कम १५,६१०/- रुपये व पत्त्यांची पाने सापडली आहेत. आरोपींना पोलिसांनी बीएनएस कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- रोख रक्कम, cash seized, पत्त्यांची पाने, playing cards, महाराष्ट्र जुगार कायदा, Maharashtra Gambling Act, कलम १२(अ), Section 12(a), बीएनएस कलम ३५(३),
- पोलिस छापा, police raid, वाल्हेकरवाडी रोड, Walhekarwadi Road, पवना नदी, Pawna River, आरोपी, accused, नोटिस बजावली, notice served
- चिंचवड, Chinchwad, जुगार, gambling, जुगार अड्डा, gambling den,