पिंपरीत वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
May 09 2026
50
पिंपरीत वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ९ - वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात शुक्रवारी (ता. ८) पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ८) पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौकाकडुन शगुन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिटी प्लाझा लॉज समोरील सार्वजनिक ठिकाणी एक महिला गैरवर्तन करत होती. वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारुन डोळयाने खुणवुन, हाताने लैंगिक हावभाव करुन सार्वजनिक ठिकाणी येणाजाणाऱ्या लोकांना ती अडथळा निर्माण करत होती. तिच्या या वर्तनामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता.
या महिलेवर पिंपरी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.