news
clock
नागरी समस्यांच्या पाहणीसाठी चोविसावाडी-दत्तवाडी-काळीभिंत परिसराला महापौर रवी लांडगे भेट

नागरी समस्यांच्या पाहणीसाठी चोविसावाडी-दत्तवाडी-काळीभिंत परिसराला महापौर रवी लांडगे भेट

नागरी समस्यांच्या पाहणीसाठी चोविसावाडी-दत्तवाडी-काळीभिंत परिसराला महापौर रवी लांडगे भेट

पिंपरी, ता. ९ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चोविसावाडी-दत्तवाडी-काळीभिंत परिसराला महापौर रवी लांडगे यांनी शनिवारी (ता. ९) अधिकाऱ्यांसह भेट दिली व नागरी समस्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

चोविसावाडी-दत्तवाडी-काळीभिंत येथील रहिवासी अनेक नागरी समस्यांनी त्रासले होते. अनेक वर्षे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही त्यांना न्याय मिळाला नव्हता. अखेर गेल्या महिन्याया या रहिवाशांनी थेट महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली व त्यांची परिस्थिती कथन केली. त्यावर महापौरांनी स्वतः परिसराला भेट देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता. ९) महापौरांनी तेथे भेट देत पाहणी केली. त्याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले व लवकरात लवकर आमच्या परिसरातील समस्या सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केली.  

या वेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते बाळासाहेब मोळक, नगरसेवक सचिन तापकीर, नगरसेवक नितीन आप्पा काळजे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories