news
clock
शनिवारी ढगाळ हवामान अन् वाऱ्यामुळे शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा

शनिवारी ढगाळ हवामान अन् वाऱ्यामुळे शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा

 शनिवारी ढगाळ हवामान अन् वाऱ्यामुळे शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा 

पिंपरी, ता. ९ - उन्हाच्या कडाक्याने शहरवासिय हैराण झालेले असताना  हवामान विभागाने शनिवारी (ता. ९) पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार सायंकाळपर्यंत पाऊस तर पडला नाही पण ढगाळ हवामान आणि वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. सायंकाळी वातावरणात काहीसा गारवा पसरला व वातावरण आल्हाददायी झाले.

हवामान विभागाने शनिवारी (ता. ९) पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा , उंच ठिकाणी तसेच मोकळ्या जागांवर जाणे टाळावे, झाडाखाली उभे राहू नये, प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. चारच्या सुमारास पावसासारखे वातावरण झाले होते. वादळी वाराही सुटला होता. मात्र, पाऊस पडला नाही. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories