कॉकरोच जनता पार्टीकडूनकॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व राजीनाम्याची मागणी
कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व राजीनाम्याची मागणी
पुणे, ता. २५ - नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार या मुद्द्यांवरून कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरू आहे. तेथूनच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुन्हा त्यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.
अभिजीत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते व्हाईटबोर्डवर "वाढदिवसाच्या शुभेच्छा, धर्मेंद्र प्रधान. कृपया राजीनामा द्या," असे लिहिताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. हे आंदोलन गेल्या सहा दिवसांपासून सुरू आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे 'कॉकरोच जनता पार्टी'ने स्पष्ट केले आहे.