news
clock
फिरंगाई देवीची यात्रेनिमित्त दापोडी परिसरात सोमवारी, मंगळवारी वाहतूकीत बदल

फिरंगाई देवीची यात्रेनिमित्त दापोडी परिसरात सोमवारी, मंगळवारी वाहतूकीत बदल

फिरंगाई देवीची यात्रेनिमित्त दापोडी परिसरात सोमवारी, मंगळवारी वाहतूकीत बदल 

पिंपरी, ता. ३० - दापोडी येथे ग्रामदैवत फिरंगाई देवीची यात्रा सोमवारी (ता. ३०) व मंगळवारी (ता. ३१) होत आहे. या यात्रेसाठी दापोडी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन यात्रेच्या दोन्ही दिवशी दापोडी परिसरात वाहतूकीत बदल केले आहेत. 

याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.

नागरीकांनी सोमवारी (ता. ३०) व मंगळवारी (ता. ३१) पर्यायी मार्गांचा वापर करुन वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. वाहतूकीतील बदल सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे -

१. संविधान चौक बोपोडीकडून दापोडी गावठाणाकडे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदरची वाहने हॅरिसब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.

२. शितळा देवी चौक दापोडी येथे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदरची वाहने पिंपळे गुरव मार्गे व फुगेवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील,

३. सांगवीकडून दापोडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदरची वाहने शितळादेवी चौकातून डावीकडे वळून फुगेवाडी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories