news
clock
वडगाव मावळात २ ते ४ एप्रिल दरम्यान श्री पोटोबा महाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

वडगाव मावळात २ ते ४ एप्रिल दरम्यान श्री पोटोबा महाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

वडगाव मावळात २ ते ४ एप्रिल दरम्यान श्री पोटोबा महाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन 

विविध धार्मिक कार्यक्रम, भजन स्पर्धा, शोभेचे दारुकाम स्पर्धा, छकडी बैलगाडा स्पर्धा, संगीत कार्यक्रम आणि  कुस्ती स्पर्धा होणार 

पिंपरी, ता. ३० - वडगाव मावळ येथे २ ते ४ एप्रिल या कालावधीत ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव  व श्री हनुमान जन्मोत्सव आयोजित केला आहे. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन स्पर्धा, शोभेचे दारुकाम स्पर्धा, छकडी बैलगाडा स्पर्धा, संगीत कार्यक्रम आणि  कुस्ती स्पर्धा होणार आहे, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र म्हाळस्कर यांनी दिली.

 गुरुवारी (ता. २) पहाटे देवस्थानचे विश्वस्त व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोटोबा महाराजांचा अभिषेक, सकाळी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडेल. सकाळी छबिना, दुपारी बगाड व मानाच्या काठ्या सोलळा, रात्री शोभेचे दारुकाम व भजन स्पर्धा होईल. विजेत्या प्रथम पाच क्रमांकांना अनुक्रमे १८,०००/-, १५,०००/-, १२,०००/-, १०,०००/- व ५०००/- या प्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. स

सांगितीक कार्यक्रमात भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल. 

शुक्रवारी (ता. ३) सकाळी पालखी मिरवणुकीत आळंदीतील बाल भजनी मंडळाचे सादरीकरण होईल.  दुपारी ५२ कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.

शनिवारी (ता. ४) बैलगाडा स्पर्धेतील प्रथम ५ क्रमांकांना अनुक्रमे ५१,०००/-, ४१,०००/-, ३१,०००/-, २१,०००/-, ११,०००/- हजारांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील प्रथम क्रमांकाला मोटारसायकल, द्वितीय व तृतीय क्रमांकाला स्कुटी, चौथ्या क्रमांकासही रोख रक्कमेचे पारितोषिक मिळणार आहे. 

 उत्सव समितीचे अतिश ढोरे, शेखर वहिले, बाळासाहेब तुमकर, सुहास विनादे, गजानन भेगडे, अजय भवार, सहास वायकर, संदिप म्हाळसकर, भूषण मुथा, अनिल कोद्रे, कुलदिप ढोरे, प्रवीण पाटोळे, अतुल राऊत, सतिश गाडे, अमोल खोल्लम यांनी कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories