news
clock
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हजारो अनुयायी नतमस्तक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हजारो अनुयायी नतमस्तक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हजारो अनुयायी नतमस्तक 

पिंपरी, ता. १५ - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पिंपरी-चिंचवडमध्ये दिमाखात साजरी करण्यात आली. हजारो नागरीक पिंपरी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका, विविध संस्था-संघटना आणि नागरीकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. सर्वत्र फडकणाऱ्या निळ्या ध्वजांनी वातावरण भीममय झाले होते. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या विचार प्रबोधन पर्वातील कार्यक्रम पाहण्यासाठी काल प्रचंड गर्दी झाली होती. भीमसृष्टीच्या परिसरात बाबासाहेबांच्या प्रतिमा, त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके विक्रीस उपलब्ध होती. शहर आणि परिसरातून नागरीक सहकुटुंब बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आले होते. या भीम अनुयायांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आपले छायाचित्र टिपून आठवणी कॅमेऱ्यात साठवल्या.

पिंपरीसह आणि शहरातील उपनगरांमध्ये परिसरात सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या मिरवणूका निघाल्या. या मिरवणूकांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. शहरातील बुद्धविहारांमध्येही विविध कार्यक्रमांनी बाबासाहेबांना वंदन करण्यात आले. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories