news
clock
अग्निशमन विभागामार्फत भाटनगर मैला शुद्धीकरण केंद्रा-भाटनगरतील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण

पिंपरी, ता.  १३ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत मैला शुद्धीकरण केंद्र-भाटनगर येथील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. कर्मचाऱ्यांची सजगता, सुरक्षितता आणि कार्यक्षम प्रतिसाद क्षमता वाढवणे या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी आग, गॅस गळती किंवा इतर आपत्तीच्या वेळी योग्य समन्वय आणि तत्काळ कारवाई कशी करावी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवली. मैला शुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्वतः ही  प्रात्यक्षिके करुन पाहिली. आगीच्या वेळी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची याचे ज्ञान आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाले, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.  

शहर अग्निशामक दलाकडून शाळांमध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांना, गृहरचना संस्थांमध्ये नागरीकांना आगीच्या वेळच्या परिस्थितीत काय करायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण आपत्कालीन परिस्थिती हातळण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.  आग लागल्यास घाबरु नका, तत्काळ १०१ वर संपर्क साधा, असे आवाहन यावेळी अग्शिशामक दलाने केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories