news
clock
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे भोंदू खरातकडे भविष्य पाहायला जायच्या - तृप्ती देसाई

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे भोंदू खरातकडे भविष्य पाहायला जायच्या - तृप्ती देसाई

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे भोंदू खरातकडे भविष्य पाहायला जायच्या - तृप्ती देसाई 

''मी जबाबदारीने बोलत आहे.'' असे अधोरेखील करुन पुण्यातील पत्रकार परिषदेत केला दावा 

पुणे, ता. ३० - भोंदू अशोक खरात प्रकरणाशी जोडलेल्या अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहेत. आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नावही सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात जोडले आहे. नीलम गोऱ्हे या देखील भोंदू खरातकडे भविष्य पाहायला जायच्या असा दावा देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.  देसाई यांच्या या माहितीने राजकीय क्षेत्रात आणखी एक हादरा बसला आहे.

नुकतीच तृप्ती देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. देसाई म्हणाल्या की, ''खरातकडे जाणाऱ्या ३९ आमदारांमध्ये नीलम गोऱ्हे यांचाही समावेश आहे. त्या मागील ७ ते ८ वर्षांतून अशोक खरातच्या संपर्कात होत्या. नाशिकमधील ज्या ऑफिसमध्ये खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले त्याच ऑफिसला नीलम गोऱ्हे त्याला भेटल्या होत्या तसेच त्या खरातला नाशिकमधील एक्प्रेस हॉटेलमध्येही भेटल्या होत्या. आमदारकी, विधान परिषद आणि मंत्रीपदाबाबत भविष्य जाणून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे खरातला भेटल्या.''  

''खरात व गोऱ्हे यांच्यात पैशांची देवाणघेवाण झाली का याची चौकशी एसआयटीने करावी.'' अशी मागणी करुन अशोक खरातचे शिक्षण क्षेत्राशी संबंध होते, याची एसआयटीकडे माहिती आहे, असे देसाई यांनी सांगितले. 

''मी जबाबदारीने बोलत आहे.'' असे अधोरेखील करुन तृप्ती देसाई म्हणाल्या की, ''नीलम गोऱ्हे या संविधानिक पदावर आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत. पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार करणार आहे. त्यांच्यावर टीका केली म्हणून त्या जर हक्क भंगाची नोटीस पाठवणार असतील तर त्यांनी खरे बोलावे. वेळ पडली तर ज्यांना हे माहित आहे त्या लोकांना मी कॅमेऱ्यासमोर घेऊन येईन.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories