news
clock
राज्यभरात उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाची माहिती

राज्यभरात उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाची माहिती

राज्यभरात उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाची माहिती 

पुणे, ता. १५ - राज्यभरात उन्हाची तीव्रता खूपच वाढली आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरात पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता. १५) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आणि सोलापूर व सांगली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने सांगितले आहे की, अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी अकोलापाठोपाठ अमरावती आणि वर्धा येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जगभरातील शहरातील तापमानाची नोंद ठेवणाऱ्या एल डोरॅडो या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ४४ अंशांची नोंद झालेले अकोला शहर हे बुधवारी जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. गुलबर्गा येथेही ४४ अंश तापमान होते. मंगळवारी जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या पहिल्या १५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाच, देशातील एकूण दहा शहरांचा समावेश होता.

राज्यातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) असे - 

- अकोला ४४.० 

- अमरावती ४३.८

- वर्धा ४३.५ 

- सोलापूर ४३.२ 

- यवतमाळ ४२.६ 

- गडचिरोली ४२.६

- चंद्रपूर ४२.२ 

- नागपूर ४२.२ 

- वाशीम ४२.४ 

-परभणी ४२.१




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories