news
clock
पती-पत्नीच्या भांडणातून पत्नीच्या नातेवाईकांची पतीला मारहाण

पती-पत्नीच्या भांडणातून पत्नीच्या नातेवाईकांची पतीला मारहाण

पती-पत्नीच्या भांडणातून पत्नीच्या नातेवाईकांची पतीला मारहाण 

पिंपरी, ता. ९ - पत्नीच्या मोबाईलमधील संभाषण पतीने ऐकल्याने पत्नीने तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि या नातेवाईकांनी पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना २७ एप्रिलाला भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीत घडली होती. या प्रकरणी तिघांवर शुक्रवारी (ता. ८) भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत, मारहाण झालेले पती विनायक चिंतामण घोडे (वय ३५ वर्ष, पेंटर, रा. चक्रपाणी वसाहत मधुबन सोसायटी, भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव (वय अंदाजे ५५ वर्षे, रा. चिखली), प्रकाश बाळु उंबरे (वय २३ वर्षे अंदाजे, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) व योगेश बाळु उंबरे (वय २८ वर्षे अंदाजे) हे या घटनेतील आरोपी आहेत.

 फिर्यादी घोडे यांनी आपल्या पत्नीच्या मोबाईलमधील आरोपीत यादव याच्यासोबतचे बोलण्याचे रेकॉर्डींग ऐकले. त्याबाबत पत्नीला विचारले असता तिने तिचे आई-वडील, भाऊ, ठेकेदार यादव यांना घरी बोलावेले. ठेकेदार यादव याने हातातील लाकडी दांडक्याने घोडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपीत प्रकाश व योगेश यांनी घोडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ''माझ्या बहिणीला अजिबात काही विचारायचे नाही, तुला जर पुण्यात राहण्याचे असेल तर तिला त्रास दयाचा नाही, नाहीतर तुला सोडणार नाही.", अशी धमकी देऊन ते घोडे यांच्या पत्नीला घेऊन गेले. 

आरोपींना अटक केली नाही. त्यांच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात  भारतीयन्याय संहिता कलम ११८ (१), ११५, ३५१(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories