निघोजे येथे जुगार अड्ड्यावर छापा, तीन जणांवर गुन्हा दाखल

निघोजे येथे जुगार अड्ड्यावर छापा, तीन जणांवर गुन्हा दाखल

 निघोजे येथे जुगार अड्ड्यावर छापा, तीन जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १५ - दक्षिण म्हाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत निघोजे येथे मंगळवारी (ता. १४) पोलिसांनी अवैध जुगारावर अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत तिघांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट- ४ च्या पथकाने  सकाळी सुमारे १०.१५ वाजता निघोजे गावच्या हद्दीत महिंद्रा कंपनी गेट नंबर २ समोर फूटपाथवर ही कारवाई केली. आरोपी  अनधिकृतपणे “फाईव्ह स्टार सॉर्ट” नावाचा पत्त्यांचा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. छाप्यात जुगाराचे साहित्य तसेच रुपये ३,२०० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलीस अंमलदार तिडके यांनी फिर्यादी नोंदवली आहे. आरोपींना बीएनएस कलम ३५ (३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories