news
clock
गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक

संत तुकारामनगर पोलीसांनी केला १५८ ग्रॅम गांजा जप्त, महिलेला अटक

पिंपरी, ता. २२ - संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी (ता. २१) सार्वजनिक ठिकाणी येथून १५८ ग्रॅम गांजा जप्त केला गेला. गांजा बाळगणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आरोपी महिलेकडे एकूण ७९००/- रुपये किंमतीचा १५८ग्रॅम गांजा सापडला. हा गांजा तिने बेकायदेशिररित्या विक्रीसाठी जवळ बाळगला होता. तिच्याकडे चौकशी केली असता तिने तिचा पती कालीचरण तामचीकर याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories