news
clock
ऑडी कार अन् ७५ हजारांजा गांजा तरुणाकडून जप्त, शिरगाव पोलिसांची कारवाई

ऑडी कार अन् ७५ हजारांजा गांजा तरुणाकडून जप्त, शिरगाव पोलिसांची कारवाई

ऑडी कार अन् ७५ हजारांजा गांजा तरुणाकडून जप्त, शिरगाव पोलिसांची कारवाई 

पिंपरी, ता. ८ - तब्बल ७५ हजार रुपयांचा गांजा बाळगणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला शिरगाव पोलिसांनी बुधवारी (ता. ६) उर्से टोल प्लाझा परिसरातून अटक केली आहे. याबाबत, महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी दिपांशु ठकराल यांनी फिर्याद दिली होती. 

आरोपी ओसामा रईस अहमद (वय २७ वर्षे) हा दक्षिण दिल्लीचा आहे. ६ मे रोजी तो मावळात ऑडी कारसह सापडला. त्याने एकूण ७५,०००/- रु किंमतीचा ७२.११ ग्रॅम वजनाचा गांजा (हायड्रोफोनिक) अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या बाळगला होता. त्याच्याकडून गांजा व ऑडी कार असा  १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

आरोपीवर शिरगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ७)  एन डी पी एस कायदा १९८५ कलम ८ (क) २० (ब) ( ) (अ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories