सांगवीमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या ७ जणांची अग्निशमन दलाने केली सुखरुप सुटका
पिंपरी, ता. ८ - सांगवी परिसरात एका इमारतीच्या लिफ्टमध्ये सात नागरिक अडकल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोचून अथक परिश्रमानंतर या सर्वांची सुखरूप सुटका केली आहे.
सांगवी येथील कृष्णा चौकाजवळ असलेल्या शंकर प्लाझा या इमारतीमध्ये ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींनी एकाच वेळी प्रवेश केल्याने तांत्रिक बिघाड झाला आणि लिफ्ट मध्येच अडकली. यामध्ये सात जण अडकले होते. लिफ्ट अडकल्याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सुमारे २ ते ३ तासांच्या थरारानंतर जवानांनी लिफ्टचे दरवाजे उघडून आत अडकलेल्या सातही जणांना सुखरूप बाहेर काढले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
- अधिक व्यक्तींचा प्रवेश, Overcrowding, आपत्ती व्यवस्थापन, Disaster management,
- ७ नागरिक, 7 citizens, तांत्रिक बिघाड, Technical malfunction,
- , शंकर प्लाझा, Shankar Plaza, कृष्णा चौक, Krishna Chowk,
- अग्निशमन दल, Fire brigade, सुखरूप सुटका, Safe rescue,
- सांगवी, Sangavi, लिफ्ट अडकली, Lift trapped,
- पिंपरी-चिंचवड, Pimpri-Chinchwad