news
clock
पिंपरीत २३ वर्षीय तरुणाकडून दोन पिस्तूले जप्त

पिंपरीत २३ वर्षीय तरुणाकडून दोन पिस्तूले जप्त

पिंपरीत २३ वर्षीय तरुणाकडून दोन पिस्तूले जप्त 

पिंपरी, ता. ८ - घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असताना दोन पिस्तूले बाळगणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी निराधारनगर-पिंपरी येथून गुरुवारी (ता. ७) रात्री साडेआठच्या सुमारास ताब्यात घेतले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिल अंकुश खेडकर (वय-२३ वर्षे, रा.भीमनगर, पिंपरी) याने अवैधरित्या एक देशी बनावटीचे ५०,०००/- रुपये किंमतीचे सिल्वर व काळसर रंगाचे  देशी बनावटीचे मॅगझिनसह असलेले पिस्तूल, रुपये २०,०००/-  किंमतीचे काळया रंगाच्या धातूचे गावठी पिस्तूल व  ५००/- रुपयांचे एक जिवंत काडतूस जवळ बाळगले होते. पिंपरी रेल्वे पटरीच्या संरक्षण भिंतीच्या बाजूला तो सापडला. पिस्तूल-काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास बंदी आदेशाचा भंग करुन आरोपीने पिस्तूले बाळगली होती. 

आरोपीवर पिंपरी पोलिस ठाण्याच भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories