मनोधैर्य योजनेंतर्गत नसरापूर व म्हाळुंगे येथील अत्याचारित बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत
मनोधैर्य योजनेंतर्गत नसरापूर व म्हाळुंगे येथील अत्याचारित बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत
पुणे, ता. ९ - नसरापूर आणि म्हाळुंगे येथे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या दोन बालकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. आधार मिळाला आहे. राज्य सरकारच्या 'मनोधैर्य' योजनेअंतर्गत ही मदत देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी शुक्रवारी (ता. ८) यासंदर्भात समिती सदस्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही प्रकरणांतील कागदपत्रांची सविस्तर कायदेशीर तपासणी करण्यात आली. दोन्ही बालकांच्या कुटुंबास प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा दुर्दैवी घटनांमुळे झालेले मानसिक आणि शारीरिक नुकसान आर्थिक मदतीने कधीही भरून निघणारे नसते. मात्र, पीडित बालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या पुनर्वसनासाठी ही मदत मोलाची ठरु शकते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी नेहमीच तत्पर आहे, असे न्यायाधीश महाजन यांनी स्पष्ट केले.
- rehabilitation, government scheme, legal authority, Pune, Maharashtra, legal aid, mental health support
- victim support, child welfare, financial assistance, sexual abuse,
- राज्य सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायाधीश महेंद्र महाजन,
- आर्थिक मदत, 10 लाख रुपये, लैंगिक अत्याचार, बालकांचे संरक्षण,
- मनोधैर्य योजना, मनोधैर्य, नसरापूर, म्हाळुंगे, बालकांचे पुनर्वसन,