news
clock
१ मे पासून  महाराष्ट्रात टॅक्सी व ऑटो चालकांना मराठी लिहिता-वाचता येणे अनिवार्य - प्रताप सरनाईक

१ मे पासून महाराष्ट्रात टॅक्सी व ऑटो चालकांना मराठी लिहिता-वाचता येणे अनिवार्य - प्रताप सरनाईक

 १ मे पासून  महाराष्ट्रात टॅक्सी व ऑटो चालकांना मराठी लिहिता-वाचता येणे अनिवार्य - प्रताप सरनाईक 

पुणे, ता. १५ - संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनापासून अर्थात १ मे पासून टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी लिहिता व वाचता येणे अनिवार्य असणार आहे.  अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले आहे. 

याबाबत, माहिती देताना सरनाईक यांनी सांगितले आहे की, मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत टॅक्सी आणि ऑटो चालकांचे  परवाने तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, त्यांना मराठी लिहिता, वाचता येते की नाही याची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करुन चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.

 राज्यात अनेक परवानाधारक टॅक्सी आणि ऑटो चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे, असे प्रताप सरनाई म्हणाले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories