news
clock

नागरीकांशी समन्वय साधून तत्परतेने समस्या सोडवा : महापौर रवी लांडगे

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात विकासकामांचा घेतला आढावा

पिंपरी, ता. १८ - ''प्रत्येक प्रभागातील नगरसदस्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करणे अत्यावश्यक आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नगरसदस्यांशी सातत्याने समन्वय राखत स्थानिक अडचणींची अचूक नोंद घेऊन त्या तत्परतेने व परिणामकारक पद्धतीने सोडवाव्यात.'' , अशा सूचना महापौर रवी लांडगे यांनी दिल्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात नागरी सुविधांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण, स्थापत्य, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, भटके कुत्रे, उद्यानांची देखभाल तसेच इतर मूलभूत नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकी दरम्यान परिसरातील नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी समन्वय साधून कार्यवाही करावी आणि अनावश्यक विलंब टाळून निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश महापौरांनी दिले.  नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर वेळेत कार्यवाही करणे गरजेचे असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट केल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल, असेही महापौरांनी सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories