news
clock

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी टी-शर्ट खरेदी प्रस्तावास मान्यता

पिंपरी, ता. १९ - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागामार्फत शहरातील महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या 'सूर्यनमस्कार महोत्सव- २०२६'साठी टी-शर्ट खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

या खरेदीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार प्राप्त दरपत्रकांपैकी मे. स्वामी एंटरप्रायजेस, लोणी काळभोर यांनी सर्वात कमी दराचे कोटेशन सादर केले. त्यामुळे त्यांच्या दरांना मान्यता देण्यात आली आहे. कार्यक्रमाचा कालावधी लक्षात घेता संबंधित ठेकेदारासोबत करारनामा करून पुरवठा आदेश दिला आहे. 

माध्यमिक शिक्षण विभागाकडून २३ जानेवारी २०२६ रोजी यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना टी-शर्ट पुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमासाठी एकूण ९ लाख ९० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून, त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास चालना मिळणार आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories