news
clock
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत पाटील

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत पाटील

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी, ता. ८ - ''पिंपरी-चिंचवड शहर क्रीडा क्षेत्रात वेगाने पुढे जात असून महापौर चषकासारख्या स्पर्धांमुळे राज्यातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. अशा स्पर्धा केवळ खेळापुरत्या मर्यादित राहत नाहीत तर शिस्त, नेतृत्व आणि संघभावना घडविण्याचे कार्य करतात.'', अशा शब्दांत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील क्रिडा स्पर्धांच्या आयोजाचे कौतुक केले. आपला देश क्रीडा क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून २०३६ पर्यंत भारत नक्कीच ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद यशस्वीपणे भूषवेल, असे देखील ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे आयोजित 'महापौर चषक २०२६-२०२७' राज्यस्तरीय स्पर्धेला मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला तसेच खेळाडूंसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, विधानपरिषद सदस्या आमदार उमा खापरे ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महिला बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य शाम जगताप, मंदार देशपांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, आय.टी.सेलच्या संजिवनी पांडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य विलास मडिगेरी, विकास डोळस, राजू दुर्गे, ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'भारत क्रीडा क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून २०३६ मध्ये भारतात  ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या दृष्टीने देशभरात क्रीडा स्पर्धांसाठी अत्याधुनिक क्रीडांगणे, प्रशिक्षण केंद्रे व आवश्यक सोयी-सुविधा उभारल्या जात आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध उपक्रमांमुळे क्रीडेला चालना मिळत असून खेळाडूंना जागतिक दर्जाचे वातावरण व प्रशिक्षण उपलब्ध होत आहे. ही सर्व पावले २०३६ ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वाची तयारी मानली जात असून भारत त्या दिशेने सक्षम पायाभरणी करत आहे.''

यावेळी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये बॉक्सिंग क्षेत्रातील विजय यादव, सायकलिंग क्षेत्रातील मीनाक्षी शिंदे, पॅरा जलतरणपटू वैष्णवी जगताप तसेच कबड्डीपटू विराज लांडगे यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरातील क्रीडा संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर महापौर रवी लांडगे यांनी शहरातील युवकांना दर्जेदार क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच अशा स्पर्धांमधून अनेक गुणवंत खेळाडू घडतील,असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories