news
clock
नसरापूरातील अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ

नसरापूरातील अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ

नसरापूरातील अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ 

पुणे, ता. ८ - नसरापूर अत्याचार प्रकरणातील बालिकेच्या प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये बालिकेच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. या जखमा टणक हत्याराने केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. ७) न्यायालयात दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला विशेष न्यायालयाने सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, आरोपीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल, लैंगिक सक्षमता चाचणी अहवाल, सीसीटीव्ही चित्रीकरण, घटनास्थळाचा पंचनामा ही कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली आहेत. शवविच्छेदन अहवालात बालिकेच्या शरीरावर जखमा आढळल्या असून, या जखमा कोणत्या हत्याराने केल्या, गुन्ह्यात आरोपीने नेमक्या कोणत्या हत्याराचा वापर केला, ते हत्यार हस्तगत करायचे आहे. जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेनंतर आरोपी गाठोडे घेऊन जाताना दिसत आहे. या गाठोड्याचा शोध घेऊन त्यात नेमके काय होते?, याचा तपास करायचा आहे. तसेच गोठ्यात जाताना आरोपी आणि मुलीच्या हातामध्ये शेवपुडा दिसत असून, ती शेव त्याने नेमक्या कोणत्या दुकानातून खरेदी केली ?, त्याला आणखी कोणी मदत केली का ? याचा तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील अॅड. अरुंधती ब्रह्मे यांनी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ केली आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories