news
clock
पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 

पुणे, ता. ८ - पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा व विदर्भात वादळी पावसाचा  इशाराही देण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, ७ ते ९ मे दरम्यान राज्यातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज, शुक्रवारी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

उद्या शनिवारी पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पुन्हा वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

 विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories