news
clock
जिवंत काडतुसासह पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला अटक

जिवंत काडतुसासह पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला अटक

जिवंत काडतुसासह पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला अटक 

पिंपरी, ता. ९ - अंजठानगर-चिंचवड येथे २३ वर्षीय युवकाकडून  एकुण ५१,५००/- रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व १,५००/- रुपयांची तीन जीवंत काडतुसे निगडी पोलिसांनी शुक्रवारी (ता. ८) जप्त केली आणि युवकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण उर्फ राजु ज्ञानदेव तिरकर (वय-२३ वर्षे रा. अजंठानगर, चिंचवड) याने शस्त्र बंदी आदेशाचा भंग करुन, सार्वजनिक ठिकाणी एकूण ५१,५००/- रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल व १,५००/- रुपयांची तीन जीवंत काडतुसे बाळगली होती. जानेवारी २०२६ च्या आदेशान्वये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतून, पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून  व पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीतून आरोपीला दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. या तडीपार आदेशाचाही त्याने भंग केला आहे. 

आरोपीविरोधात निगडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५,१४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories