news
clock
घरात आता एकच गॅस कनेक्शन ठेवता येणार.....'पीएनजी' किंवा 'एलपीजी'

घरात आता एकच गॅस कनेक्शन ठेवता येणार.....'पीएनजी' किंवा 'एलपीजी'

घरात आता एकच गॅस कनेक्शन ठेवता येणार.....'पीएनजी' किंवा 'एलपीजी'

भारत सरकारकडून घरगुती गॅससाठी १ मे पासून 'एक घर, एक कनेक्शन' या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी सुरु

पुणे, ता. ८ - भारत सरकारने घरगुती गॅससाठी १ मे पासून 'एक घर, एक कनेक्शन' या धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे. या धोरणानुसार, एकाच घरामध्ये किंवा एकाच पत्त्यावर एकाच वेळी सबसिडीयुक्त एलपीजी (LPG) सिलेंडर आणि पाईप गॅस (PNG)ही दोन्ही कनेक्शन वापरणे बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे, गॅस पुरवठ्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १४ मार्च रोजी अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत नियमांमध्ये सुधारणा केल्या, त्यानुसार एक घर, एक कनेक्शन धोरण लागू करण्यात आले. पीएनजी कनेक्शन असलेल्या घरांना अनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर ठेवण्याची परवानगी राहणार नाही. पीएजी कनेक्शन असल्यास एलपीजी कनेक्शन तत्काळ परत करावे लागेल. नवीन एलपीजी कनेक्शन देणेही तात्पुरते थांबवण्यात आले आहे. याबाबत, पीएनजी असलेल्या घरांना नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये किंवा सिलिंडर रिफिल करु नये, असे निर्देश गॅस वितरकांना जारी करण्यात आले आहेत. 

याबाबत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त सचिव  सुजाता शर्मा यांनी सांगितले आहे की, देशभरातील दुहेरी कनेक्शन असलेल्या कुटुंबांची संख्या जाणून घेण्यासाठी सध्या डेटा मूल्यांकन सुरु असल्याचे सांगितले.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पीएनजी  गॅस उपलब्ध नाही त्यांना प्राधान्य तो दिला जाणार आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories