news
clock
रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जागृती राज्यभरात करणार, महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचा पुढाकार

रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जागृती राज्यभरात करणार, महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचा पुढाकार

रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जागृती राज्यभरात करणार, महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचा पुढाकार

पिंपरी, ता. ९ - महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत राज्यभरात रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जागृती करणार आहे, अशी माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड व राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी दिली आहे. रुग्णालयांची मनमानी खपवून न घेता रुग्णांनी आपल्या हक्क सेवांबाबत जागृत रहावे यासाठी ही जागृती मोहिम हाती घेण्यात येत आहे. 

याबाबत बोलताना लाड यांनी सांगितले की, '' वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण हा केवळ एक रुग्ण नसून, तो सेवा घेणारा ग्राहक देखील आहे. आरोग्य मंत्रालयाची 'रुग्ण हक्क सनद' आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत रुग्णांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तरीही अनेक रुग्णालयांकडून जनतेची लूट होत होताना दिसते. म्हणूनच ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जनजागृती करणार आहे.'' ''रुग्णांनी उपचारादरम्यान सजग राहणे गरजेचे आहे. कोणत्याही रुग्णालयाकडून हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर घाबरून न जाता लेखी तक्रार नोंदवावी. ग्राहक पंचायत महाराष्ट्र अशा अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सदैव तत्पर आहे.'' असे अरुण वाघमारे यांनी सांगितले.

 बिलाचा सविस्तर तपशील मिळविणे, उपचारापूर्वी खर्चाचा अंदाज देणे, औषधांच्या किमतीवर नियंत्रण  ७२ तासांत, वैद्यकीय कागदपत्रे मिळवणे,  कॅशलेस विमा धारकांसाठी नियम निश्चित करणे या महत्तवाच्या गोष्टींचा रुग्ण हक्कांमध्ये समावेश आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories