कासारवाडीतील महापालिकेच्या शाळेची जागतिक पातळीवर दहा सर्वोत्तम शाळांमध्ये निवड

कासारवाडीतील महापालिकेच्या शाळेची जागतिक पातळीवर दहा सर्वोत्तम शाळांमध्ये निवड

कासारवाडीतील महापालिकेच्या शाळेची जागतिक पातळीवर दहा सर्वोत्तम शाळांमध्ये निवड

 पिंपरी, ता.‌ २५ - जागतिक पातळीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कासारवाडी येथील महापालिकेच्या छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलची जागतिक सर्वोत्तम १० शाळांमध्ये निवड झाली आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी, महापालिकेच्या शाळांसाठी आणि तमाम शहरवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.  शाळेतील शिक्षकांनी हा पुरस्कार स्वीकारला.‌

शाळेतील शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम आणि त्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यश शाळेला मिळाले आहे. यशामुळे महापालिकेच्या इतरही शाळांना प्रेरणा मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी जल्लोष करून आपल्या शाळेला पारितोषिक मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories