लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता मिळण्याची भगिनींना प्रतिक्षा

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता मिळण्याची भगिनींना प्रतिक्षा

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता मिळण्याची भगिनींना प्रतिक्षा 

पुणे, ता. २५ - जून महिना संपायला ६ दिवस बाकी राहिले तरी जून महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला नाही. हे पैसे जमा होण्याची  भगिनी वाट पाहत आहेत.

यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आले. त्यानंतर मे महिन्याचा फक्त मिळण्यासाठी  महिलांना वाट बघावी लागली होती. आता जून महिन्याचा हप्तासाठीही महिलांना वाट बघावी लागते आहे. 

सरकारने नुकतीच ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची पडताळणी केली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यास सरकारी योजनांचे पैसे जमा होण्यात अडथळे येऊ शकतात.




.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories