रेडझोन प्रभावीत मिळकतींना मालमत्ता करात ५०% सवलत मिळणार
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रेडझोन (Red Zone) बाधित मिळकतींना मालमत्ता करात ५०% सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे रेडझोन प्रभावित भागांमधील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
ही सवलत १ एप्रिल २०२६ पासून (२०२६-२७ आर्थिक वर्षापासून) लागू होणार आहे. मालमत्ता करातील सामान्य करात ५० टक्के सूट मिळेल. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांना ३१ मार्च २०२६ पर्यंतचा संपूर्ण मूळ मालमत्ता कर आणि थकबाकी भरणे आवश्यक आहे. या निर्णयाचा फायदा रेडझोन प्रभावीत दिघी, भोसरी, चिखली, तळवडे, निगडी, किवळे व प्राधिकरणातील काही भाग येथील हजारो नागरिकांना होणार आहे.
याबाबत, आमदार महेश लांडगे म्हणाले की, ''अनेक वर्षांपासून रेडझोन निर्बंधांमुळे नागरिकांना ना पूर्ण विकास, ना पुरेशा सुविधा… तरीही कराचा बोजा.... या परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता अखेर महापालिकेने नागरिकांच्या भावना लक्षात घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून रेडझोन हद्दीतील मिळकतींना सामान्य करात ५०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून विकास निर्बंध व अपुऱ्या सुविधांचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून रेडझोन बाधित नागरिकांना न्याय देण्यास कटिबद्ध आहोत.''
थोडक्यात -
- रेडझोन प्रभावित भाग:
दिघी, भोसरी, चिखली, तळवडे, निगडी, किवळे, प्राधिकरणातील काही भाग
- २०२६-२७ आर्थिक वर्षापासून सवलत लागू
- मार्च २०२६ पर्यंतचा मिळकतकर पूर्ण भरावा लागणार
- 50% सवलत, 2026-27 आर्थिक वर्ष, Dighi, भोसरी, Chikhli, तळवडे, Talwade, निगडी, Nigdi, किवळे, Kivle, प्राधिकरणातील भाग, municipal tax relief, नागरिकांना दिलासा, citizens benefit,
- पिंपरी-चिंचवड महापालिका, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, मिळकतींना सवलत, affected properties,
- रेडझोन, Red Zone, मालमत्ता कर, property tax, सवलत, relief,