news
clock

खंडणीसाठी अपहरण व जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी 

आरोपींकडून दोन मोबाईल, २ कोयते, गुन्हयात वापरलेल्या २ रिक्षा, रोख रक्कम जप्त 

पिंपरी, ता. १७ - खंडणीसाठी अपहरण व जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून दोन मोबाईल, २ कोयते, गुन्हयात  वापरलेल्या २ रिक्षा, रोख रक्कम जप्त असा ५ लाख १६ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडणीविरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे.

दिनांक १६ मार्च २०२६ रोजी क्राईम कंट्रोल, गुन्हे शाखेकडून खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली की, सुरज ज्ञानेश्वर शेलार (वय ३२ वर्षे), याला मारहाण करून किडनॅप केले असून ठार मारण्याची धमकी देवुन पैश्याची मागणी केली आहे. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवून आरोपीची माहिती घेतली असता फोन करणारा तरुण साजन ज्ञानेश्वर शेलार याने त्याचा भाऊ सुरज ज्ञानेश्वर शेलार याला पवन उजगरे व सुमित कराड यांनी पैशाची मागणी करुन रिक्षातून किडनॅप केले असल्याचे सांगितले. त्याबाबत, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तसेच सांगवी पोलीस ठाण्यातही फिर्यादी नितीन शामकांत महाजन यांनी अशीच तक्रार दिली होती. ती म्हणजे, १५ मार्चला २०२६ रोजी ते रात्रौ १.३० वा नाशिक फाटा येथून सांगवी येथे जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना साई चौक, सांगवी येथे घरी जावयाचे असल्याने रिक्षामध्ये बसवुन त्यांना घरी न सोडता त्यांचे रिक्षातुन मोकळ्या मैदानामध्ये, पिंपळे गुरव, पुणे येथे जबरदस्तीने घेवून जावून कोयत्याचा धाक दाखवला.  मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले व त्यांना जिवे मारण्याची धमकी देवून त्यांच्या मोबाईलचा व फोन पे चा पासवर्ड घेवून त्यांचे फोन द्वारे एकूण १४,८१०/- रू रक्कम वेगवेगळ्या फोन पे ला ट्रान्सफर केली होती. 

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी  सहा पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे व गुन्हे-०२ श्री प्रविण मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन अपहरण झालेल्या इसमांची सुखरुप सुटका करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. 

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे रिक्षा क्र. एम.एच-१४-जी.सी-६४०४ व आणखी एक रिक्षातून भोसरी एमआयडीसी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली तसेच आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेत असताना दोन इसम वेगवेगळया दोन रिक्षा घेवून अर्थ केअर इक्युटमेन्ट कंपनी शेजारील मैदान, जी ब्लॉक, भोसरी, एमआयडीसी, पुणे या मैदानात थांबलेले मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी जवळ गेले असता ते दोन इसम पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना योग्य त्या बळाचा वापर करून ताब्यात घेतले. 

आरोपी नामे १) पवन छगन उजगरे, वय २६ वर्षे, रा. समता कॉलनी, धनगरबाबा मंदिराशेजारी, काळेवाडी, आणि  २) सुमित हनुमंत कराड, वय २८ वर्षे, रा. ज्ञानेश्वरी पार्क, रुम नं. बी-११, दिघी रोड, भोसरी यांच्याकडून एकूण ५,१६,०९०/- रुपये किंमतीचा  जबरी चोरी केलेला मोबाईल, २ कोयते, गुन्हयात वापरलेल्या २ रिक्षा, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  आरोपीकडे तपास करुन १) भोसरी पोलीस ठाणे गुरक्रं. ११५/२०२६ बि.एन.एस. कलम १३७ (२), ३०८ (४),१४० (२), ३ (५) व इतर व २) सांगवी पोलीस ठाणे गुरक्रं. १२३/२०२६ बि.एन.एस. कलम १४० (२), ३०९ (४), ३(५), व इतर असे दोन खंडणीसाठी अपहरण व जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास भोसरी व सांगवी पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे  सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे डॉ शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, श्री. प्रविण मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोउपनि सुनिल भदाणे, श्रेणी पोउपनि अमर राऊत, सपोउनी सुनिल कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुन्हाडे, चंद्रकांत जाधव, किशोर कांबळे, दादाभाऊ साबळे, भरत गाडे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories