किरकोळ कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलांकडून गृहिणीला मारहाण
पिंपरी, ता. ९ - किरकोळ कारणावरुन एका महिलेला दोन महिलांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व डोक्यात दगड मारुन जखमी केले. ही घटना गुरुवारी (ता. ७) पिंपरी रेल्वे स्टेशनच्या परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भारतनगर येथे घडली.
याबाबत, मारहाण झालेल्या ममताकौर करणसिंग (वय ३०, गृहिणी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. रिना रणदिवे (वय ४५) आणि निशा (पूर्ण नाव अज्ञात) यांनी ममताकौर यांना मारहाण केली. या दोघी फिर्यादी ममताकोर यांच्या शेजारी राहतात. या दोघींनी दुसरी एक महिला सारिका हिचा मुलगा ममताकौर यांच्या घराकडे का पाहात आहे, या विषयावरुन ममताकौर यांना लाथाबुकक्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले.
या प्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(१), ३५२, ३(५)) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Pimpri Railway Station, किरकोळ कारण, trivial reason, आरोपी, accused, रिना रणदिवे, Rina Randive, निशा, Nisha, ममताकौर करणसिंग, Mamtakaur Karansingh,
- डोक्यात दगड मारणे, stone hit on head, भारतनगर, Bharatnagar,
- पिंपरी, Pimpri, मारहाण, assault, गृहिणी, housewife, शेजारी, neighbors, लाथाबुक्क्यांनी मारहाण, beaten with kicks