news
clock

'पोलीस आयुक्तांची भेट'.... उपक्रमात नागरीकांचा पोलिसांशी संवाद

नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व सूचनांचे झाले निराकरण 

पिंपरी, ता. १७ - सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या व सूचना समजून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरु केलेल्या 'पोलीस आयुक्तांची भेट' या उपक्रमात सोमवारी (ता. १६) शहरातील ५१ नागरीक सहभागी झाले. उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व सूचना ऐकून घेऊन त्यांचे योग्य ते निराकरण करण्यात आले. 

यावेळी, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली व सर्व पोलीस उपायुक्त समक्ष हजर होते. सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. 

दिनांक ९ मार्च २०२६ पासून  पोलिस आयुक्तांची भेट हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मागील, पहिल्या सोमवारी या उपक्रमात एकूण 76 नागरिक सहभागी झाले. सदर उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केलेले आहे. सदर उपक्रमांतर्गत शहरातील नागरिक हे पोलीस आयुक्तांना दर सोमवारी दुपारी 04.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत कोणतीही पूर्व परवानगी न घेता सहज भेटू शकतात. नागरिकांनी सदर उपक्रमास उपस्थित राहून त्यांच्या तक्रारी, समस्या व सूचना मांडाव्यात, असे आवाहन 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories