इंडो अॅथलेटिक सोसायटीतर्फे आज पुणे ते पंढरपूर सायकल वारी

इंडो अॅथलेटिक सोसायटीतर्फे आज पुणे ते पंढरपूर सायकल वारी

इंडो अॅथलेटिक सोसायटीतर्फे आज पुणे ते पंढरपूर सायकल वारी

पिंपरी, ता. २० - इंडो अॅथलेटिक सोसायटी  (आयएएस) यांच्या वतीने दहावी 'पुणे ते पंढरपूर डिवोशनल सायकल राइड' येत्या आज शनिवारी (ता. २०) आयोजित केली आहे. या सायकलवारीत शेकडो सायकलपटू सहभागी झाले आहेत. हे सायकलपटू एका दिवसात सुमारे २३५ किलोमीटरचे अंतर पार करुन रात्री पंढरपूरात पोचतील. 

या सायकलवारीला शनिवारी पहाटे २:३० वाजता देहू येथून प्रारंभ झाला.  त्यानंतर भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे पहिला झेंडा दाखविण्यात आला.  नाशिक फाटा, हडपसर, जावजी बुवाचीवाडी, केडगाव, कुरकुंभ, पळसदेव, इंदापूर आणि करकंब या मार्गावर विविध ठिकाणी सहभागींसाठी अल्पोपाहार, पाणीपुरवठा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आयोजकांनी सायकलपटूंच्या सुरक्षिततेसह आरोग्याची विशेष काळजी घेत विविध ठिकाणी हायड्रेशन पॉइंट, विश्रांती केंद्रे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इंदापूर येथे दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत सायकलपटू पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास येथे पोहोचतील.

गेली दहा वर्षे सातत्याने आयोजित करण्यात आलेली ही सायकलवारी वारकरी परंपरा, पर्यावरणपूरक वाहतूक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देत आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories