रेल्वमध्ये सहाय्यक लोको पायलट पदासाठी भरती, अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरु
May 09 2026
12
रेल्वमध्ये सहाय्यक लोको पायलट पदासाठी भरती, अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरु
पुणे, ता. ९ - रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) सहाय्यक लोको पायलट (एएलपी) भरती २०२६-२७ साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. रेल्वे भरती मंडळ देशभरातील १७ रेल्वे झोनमध्ये सहाय्यक लोको पायलटच्या (एएलपी) एकूण ११,१२७ पदांसाठी भरती करणार आहे. त्यासाठीची अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया १५ मे २०२६ रोजी सुरु होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२६ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांनी rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करायचा आहे.
या भरतीमध्ये सर्वाधिक पदे ईस्ट कोस्ट रेल्वे विभागातील - १६२५ आहेत. त्याखालोखाल साऊथ ईस्टर्न रेल्वेमध्ये १५३१) आणि सेंट्रल रेल्वेमध्ये १४०० पदे भरली जाणार आहेत. उमेदवार त्यांच्या झोननुसार अर्ज करु शकतात. भरती प्रक्रियेत पहिली संगणक आधारित चाचणी (CBT 1) असेल. त्यानंतर दुसरी संगणक आधारित चाचणी (CBT- 2)असेल. तिसरी संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)असेल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
सहाय्यक लोको पायलट पदासाठी पात्रता - उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असला पाहिजे, संबंधित ट्रेडमध्ये (फिटर, इलेक्ट्रीशियन, डिझेल मेकॅनिक, इत्यादी) आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा पदवी (बीई/बी.टेक) असलेले उमेदवार देखील अर्ज करु शकतात. उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादित सवलत दिली जाणार आहे.
- rrbapply.gov.in, अधिकृत वेबसाइट, OFFICIAL WEBSITE, ईस्ट कोस्ट रेल्वे, EAST COAST RAILWAY, साऊथ ईस्टर्न रेल्वे, SOUTH EASTERN RAILWAY, सेंट्रल रेल्वे, CENTRAL RAILWAY
- आरआरबी, RRB, ऑनलाइन अर्ज, ONLINE APPLICATION, १५ मे २०२६, 15 MAY 2026, अंतिम मुदत १४ जून २०२६, LAST DATE 14 JUNE 2026,
- रेल्वे भरती, RAILWAY RECRUITMENT, सहाय्यक लोको पायलट, ASSISTANT LOCO PILOT, एएलपी, ALP,