पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

 पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे, ता. २६ - शिवसेना ठाकरे गटातून नुकतेत शिवसेना शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी काल गुरुवारी (ता. २५) मुबंईत  पत्रकारांना शिवीगाळ आणि अरेरावी केली. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली.  त्यानंतर संजय दिना पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. जो प्रकार माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये झाला आहे, त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असे पाटील यांनी म्हटलं आहे. 

 संजय दिना पाटील म्हणाले, ''जो प्रकार माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये झाला आहे त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मला सातत्याने अपमानित केले जात आहे. आज सकाळी पत्रकार मित्र पुन्हा आले तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, या विषयावर मला आता काहीही बोलायचे नाही. मात्र, वारंवार तोच प्रश्न विचारण्यात आल्यामुळे वाद वाढला. त्या गडबडीत माझ्याकडून चुकीने अपशब्द निघाले. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधू-भगिनींची मनापासून माफी मागतो. 

विरोधकांनी किंवा अन्य कोणीही माझ्यावर टीका करण्यास माझी हरकत नाही. परंतु, माझ्या पत्नी, मुलगी, आई आणि जे वडील आज हयात नाहीत, त्यांच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवणे आणि अपशब्द वापरणे चुकीचे आहे. माझ्या राजकीय भूमिकेवर तुम्हाला जे बोलायचे आहे ते जरूर बोला, पण कृपया माझ्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा", अशी विनंती त्यांनी केली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories