शिवाजीनगर मेट्रो स्थानकात 'शेअर्ड फीडर ऑटो सेवा' उपक्रमाचा प्रारंभ

शिवाजीनगर मेट्रो स्थानकात 'शेअर्ड फीडर ऑटो सेवा' उपक्रमाचा प्रारंभ

शिवाजीनगर मेट्रो स्थानकात 'शेअर्ड फीडर ऑटो सेवा' उपक्रमाचा प्रारंभ 

पुणे, ता. २० - पुणे मेट्रो व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर मेट्रो स्थानक येथे 'शेअर्ड फीडर ऑटो सेवा' या उपक्रमाचा शुक्रवारी (ता. १९ जून) रोजी प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक (एमएमआय/एचआर) कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष  बाबा कांबळे, पंचायतचे पदाधिकारी, पुणे मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.

 'शेअर्ड फीडर ऑटो सेवा' या उपक्रमाचा मुख्य उद्देश सेवेचा मुख्य उद्देश प्रवाशांना मेट्रो स्थानकावरून त्यांच्या घरापर्यंत किंवा कार्यालय परिसरापर्यंत 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी'  म्हणजेच इच्छित स्थळी पोचण्यासाठी अंतिम टप्प्यातील प्रवास स्वस्त, सुरक्षित आणि सुलभ करून देणे हा आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories