news
clock
दोन युवकांकडून दोन पिस्तूल जिवंत काडतुसांसह जप्त, कासारवाडी येथे कारवाई

दोन युवकांकडून दोन पिस्तूल जिवंत काडतुसांसह जप्त, कासारवाडी येथे कारवाई

 दोन युवकांकडून दोन पिस्तूल जिवंत काडतुसांसह जप्त, कासारवाडी येथे कारवाई 

पिंपरी, ता. २३ - बेकायदेशीरपणे रुपये १ लाख ३१ हजार किंमतीची देशी बनावटीची दोन पिस्तूल मॅग्झीन व सहा जिवंत काडतूसांसह बाळगणाऱ्या दोन युवकांना दापोडी पोलिसांनी बुधवारी (ता. २२) अटक केली आहे. कासारवाडी परिसरात भोसरी-सांगवी उड्डाणपुलाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत, पोलिस हवालदार प्रविण दौलत पाटील यांनी  तक्रार नोंदवली आहे. आरोपी यश नंदकिशोर कांबळे (वय १९ वर्षे, रा. पिंपळे गुरव) व अथर्व सुनिल भोकरे (वय २१ वर्षे, रा. नवी सांगवी) हे अटकेत आहेत. आरोपींनी  कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना सदर आदेशाचा भंग करुन रुपये १ लाख ३१ हजार किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्तूल मॅग्जीनसह, सहा जिवंत काडतुसांसह अवैधरित्या बाळगली होती. पिस्तूल,मॅग्झीन व काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. 

आरोपींविरोधात दापोडी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २२) भारतीय हत्यार कायदाकलम ३, (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories