news
clock
यादव कुटुंबियांनी साजरा केला घरातील सिंधू गोमातेचा वाढदिवस

यादव कुटुंबियांनी साजरा केला घरातील सिंधू गोमातेचा वाढदिवस

यादव कुटुंबियांनी साजरा केला घरातील सिंधू गोमातेचा वाढदिवस

पिंपरी, ता. ८ -  भारतीय संस्कृतीत गोमातेची सेवा हीच खरी सेवा श्रेष्ठ मानली जाते. म्हणूनच, भाजप युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी त्यांच्या लाडक्या 'सिंधू' गाईचा वाढदिवस अतिशय सुंदर साजरा केला. 

सिंधु गाय ही यादव परिवारातील एक सदस्यच आहे. वाढदिवसानिमित्त सिंधू गोमातेचे विधिवत पूजन करण्यात आले. तिला पुष्पहार घालून औक्षण करण्यात आले तसेच गोड खाऊ भरवण्यात आला. परिसरातील लोकही गोमातेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते. 

 दिनेश यादव म्हणाले, “गोमाता ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. तिची सेवा आणि जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सिंधु गोमाता आमच्या घरातील आनंद, सकारात्मकता आणि प्रेमाचे केंद्र आहे. तिच्या डोळ्यातील निरागसपणा आणि प्रेम पाहिलं की दिवसाचा सगळा थकवा दूर होतो.गौमातेच्या रूपात मिळालेलं हे प्रेम आमच्यासाठी खूप अनमोल आहे. ” आपल्या लाडक्या गोमातेचा वाढदिवस साजरा करुन यादव यांनी प्राण्यांप्रती प्रेम-जिव्हाळा जपण्याचा संदेश दिला आहे.  


-

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories