''माझ्या हॉटेलसमोर का बसलात''...या कारणाने तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, ता. ८ - ''माझ्या हॉटेलसमोर का बसलात''.. या कारणावरुन व्यवसायिक तरुणाने दुसऱ्या तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (ता. ५ मे) हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपीला अटक केली असून गुरुवारी (ता. ७) त्याच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, मारहाण झालेला तरु अमित विनोद सिंग (वय ३० वर्षे, पेंटीग, रा. हिंजवडी) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी आदित्य संतोष जांभुळकर (वय २३ वर्षे, रा. आदर्शनगर, हिंजवडी गावठाण) याला अटक केली आहे. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकाकडे जाणा-या मल्हारवाडा हॉटेल समोर लिंबाच्या झाडाखाली फिर्यादी अमित व फिर्यादीचा मित्र ईश्वर माधव तेंलंगे दोघेजन गप्पा मारत बसले होते. तेव्हा आरोपी तिथे आला व ''माझ्या हॉटेल समोर का बसलात'', असे म्हणून अमितला लाकडी दांडक्याने पाठीवर, हातावर, पायावर, उजव्या खुब्यावर मारुन गंभीर जखमी केले.
आरोपीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- हिंजवडी पोलिस ठाणे, Hinjewadi police station, सुरक्षा नियम, Safety rules, समाजातील हिंसा, Community violence, तरुणावरील हल्ला, Attack on youth
- गंभीर जखमी, Seriously injured,
- अमित विनोद सिंग, Amit Vinod Singh
- , गुन्हा नोंद, FIR registered,
- , Sitting in front of hotel, आरोपी अटक, Accused arrested,
- मारहाण, Beating, हिंजवडी, Hinjewadi, लाकडी दांडका, Wooden stick,