news
clock
युवकाकडून घेतलेले पैसे परत न देता युवकाच्या डोक्यात घातला दगड

युवकाकडून घेतलेले पैसे परत न देता युवकाच्या डोक्यात घातला दगड

 युवकाकडून घेतलेले पैसे परत न देता युवकाच्या डोक्यात घातला दगड 

पिंपरी, ता. २५ - स्वतःचे पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय युवकाला दगड डोक्यात घालून जखमी केल्याची घटना गुरुवारी (ता. २३) यशवंतनगर-तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. आरोपीवर शुक्रवारी (ता. २५) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारहाण झालेला युवक किरण लहू गावडे (वय २५ वर्ष, मजुरी, रा.वाघोली) यांने पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉ. महेश जोगदंड हा या घटनेतील आरोपी आहे. फिर्यादी किरण हा त्याचे पैसे मागण्यासाठी आरोपीकडे गेले होता. तेव्हा आरोपीने फिर्यादी किरणसोबत वाद घालून शिवीगाळ केली. ''मी तुझे पैसे देणार नाही तुला काही करायचे ते कर, मी बीडचा आहे, माझ्या नादाला लागायचे नाही.'', असे आरोपीने किरणला धमकावले. त्यावर किरणने ''मला काय करायचे तू कोणत्या पण गावचा असेना, मला माझे पैसे दे.''.  असे आरोपीला म्हणताच आरोपीने जमिनीवर पडलेला दगड उचलून किरणच्या डोक्यात मारला. त्यामुळे किरण जखमी झाला. 

आरोपीविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय  न्याय  संहिता कलम ११८ (२), ३५२,३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories