news
clock
क्षुल्लक कारणावरुन मित्राला मारहाण, निघोजे येथील घटना

क्षुल्लक कारणावरुन मित्राला मारहाण, निघोजे येथील घटना

 क्षुल्लक कारणावरुन मित्राला मारहाण, निघोजे येथील घटना

पिंपरी, ता. २५ - क्षुल्लक कारणावरुन मित्राशी वाद घालून त्याला धक्काबुक्की करुन जखमी केल्याचा प्रकार खेड तालुक्यात निघोजे येथे गुरुवारी (ता. २३) घडला आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) आरोपीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

मारहाणीत जखमी झालेला तरुण  गणेशकुमार राजकुमार केवट (वय ३४ वर्षे, खाजगी नोकरी, रा.  निघोजे ता. खेड) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज जोशी हा या घटनेतील आरोपी आहे. फिर्यादी गणेशकुमार व आरोपी हे दोघे गणेशकुमारचा मित्र मुकेशकडे आरोपीचा मोबाईल चार्जिंगसाठी देऊन दारु पिण्यासाठी बसले होते. तेव्हा मुकेश हा वेळेवर मोबाईल घेऊन आला नाही या कारणावरुन आरोपीने चिडून फिर्यादी गणेशकुमारशी वाद करुन शिवीगाळ केली व त्याला नदी किनारी दगडांवर जाणूनबुजून ढकलून दिल्याने तो जखमी झाला आहे. 

आरोपीवर दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) भारतीय न्याय संहिता कलम ११७ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories