प्रशासकीय फेरबदलात १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे, ता. १८ - महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय फेरबदलात १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) बदलीचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार विविध विभागांतील अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
- माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओ.पी. गुप्ता आणि सुवर्णा केवले यांचीही लोकायुक्त सदस्य म्हणून निवड झाली आहे.
- सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पी. वेलरासू यांची महसूल आणि वन विभागात सचिव (वन) या पदावर बदली करण्यात आली आहे.
- आयएएस अधिकारी अश्विनी जोशी यांची एमएमआरडीए, दीपेंद्र सिंह कुशवाहा यांची एमआयडीसी, अश्विन मुदगल यांची सिडको, कादंबरी बाळकावडे यांची उद्योग संचालनालय आणि संजय काटकर यांची राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) सारख्या प्रमुख संस्थांमध्ये बदली केली आहे.
- झेनिथ चंद्र डोंथुला आणि अनय नवंदर यांची अनुक्रमे गोंदिया आणि अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे, बी. सरवणन आणि लघिमा तिवारी यांना अनुक्रमे किनवट (नांदेड) आणि तळोडा (नंदुरबार) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (आयटीडीपी) प्रकल्प अधिकारी बनवण्यात आले आहे.