संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परतीच्या मार्गावर शनिवारी व रविवारी वाहतूकीत बदल
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परतीच्या मार्गावर शनिवारी व रविवारी वाहतूकीत बदल
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर येथून आषाढी वारी सोहळा पार पाडून शनिवारी (ता. ८ ऑगस्ट) शहरात परत येणार आहे.
शनिवारी (ता. ८) श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमध्ये येईल आणि रविवारी (ता. ९) आळंदी नगरप्रदक्षिणा व हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसाद होणार आहे. तसेच जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी (ता. ८) पिंपरीमध्ये मुक्कामी असणार आहे व रविवारी (ता. ९) पालखी विठ्ठल मंदिर, पिंपरीगाव येथून देहूगाव येथे मार्गस्थ होणार आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पालखी मार्गावर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पालखी परतीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी पालखी परतीच्या मार्गावर वाहतूक बदल करण्यात येत आहेत.
हे बदल दिघी, भोसरी, पिंपरी, निगडी व देहूरोड वाहतूक विभागांतर्गत करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने, दिंडीतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार टप्याटप्याने वाहतूक चालु/बंद करण्यात येईल.
दोन दिवस नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे पिपंरी चिंचवड शहर वाहतूक शाखेने कळवले आहे.
- वाहतूक बदल, Traffic Diversion
- पालखी परतीचा मार्ग, Palkhi Return Route
- संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi, संत तुकाराम महाराज पालखी, Sant Tukaram Maharaj Palkhi, पालखी सोहळा, Palkhi Procession
- वाहतूक शाखा, Traffic Police, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिस, Pimpri Chinchwad Traffic Police