अल्पवयीन गुन्हेगाराने तरुणाची सोनसाखळी हिसकावली, आंबेठाणमधील घटना
पिंपरी, ता. २७ - अल्पवयीन गुन्हेगाराने दुचाकीवरुन एका तरुणाची ४ लाख ४४ हजारांची सोनसाखळी गुरुवारी (ता. २६) हिसकावून नेली. ही घटना खेड तालुक्यातील आंबेठाण (घाटे वस्ती) येथे दुपारी ३.४५ घडली.
फिर्यादी रुपेश आंबुदास कौटकर (वय ३८, रा. काळुस, ता. खेड) हे त्यांच्या मालकीच्या अॅक्टिव्हा (MH 14 LR 1461) दुचाकीवरून पोकलंड ऑपरेटर राजेश कुशवाह यांना घेऊन महाळुंगे येथून आंबेठाणकडे जात होते. यावेळी आरोपीने मागून अॅक्टिव्हावरुन येत फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे ३४.९८० ग्रॅम वजनाची, अंदाजे ४ लाख ४४ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून नेली.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.