news
clock
भरधाव कार चालकाकडून ड्रायव्हरवर हल्ला; निघोजे येथे प्रकार, आरोपी फरार

भरधाव कार चालकाकडून ड्रायव्हरवर हल्ला; निघोजे येथे प्रकार, आरोपी फरार

भरधाव कार चालकाकडून ड्रायव्हरवर हल्ला; निघोजे येथे प्रकार, आरोपी फरार

पुणे, ता. २७ -  खेड तालुक्यातील निघोजे गावात भरधाव कार चालकाकडून एका ड्रायव्हरवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेत नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (ता. २५) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिराजवळील गल्ली रस्त्यावर घडली. फिर्यादी नंदू भारत सांगोलकर (वय ३०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. लोणी काळभोर) हे त्या वेळी रस्त्यावरून जात असताना स्विफ्ट कारचालक अचानक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला. यामुळे घाबरुन सांगोलकर यांनी स्वतःचा बचाव करत गाडीच्या बोनेटवरून उडी मारली व रस्त्याच्या कडेला पडले.

यानंतर सांगोलकर यांनी चालकाला जाब विचारल्याने आरोपी संतापला. त्याने शिवीगाळ करत जवळील गॅरेजमधून सुमारे ५ किलोची गॅसची टाकी उचलून त्यांच्या दिशेने फेकली. तसेच दगडाने कपाळावर वार करुन त्यांना जखमी केले. पुढे आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांवर व पाठीवर मारहाण करत गच्ची धरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेदरम्यान तीन ते चार अनोळखी व्यक्तींनीही फिर्यादीला धमकी दिली. 

या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१), ११५(२) व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक बांगर करत आहेत. आरोपी चालकाचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories