मोशी येथे होणार शिवशंभु राजांच्या इतिहासाचा तेजोमय जागर, गुरुवारी व शुक्रवारी हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
मोशी येथे होणार शिवशंभु राजांच्या इतिहासाचा तेजोमय जागर, गुरुवारी व शुक्रवारी हिंदुभूषण स्मारक ट्रस्टतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, ता. १३ - धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवशंभु राजांच्या इतिहासाचा तेजोमय जागर शहरवासियांना अनुभवायला मिळणार आहे. गुरुवारी (ता. १४) व शुक्रवारी (ता. १५) बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण येथे सायंकाळी ७ वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडेल.
यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि अत्याधुनिक डिजिटल मॅपिंगच्या माध्यमातून छत्रपती शिव–शंभुंराजांच्या शौर्य, त्याग आणि पराक्रमाचा इतिहास नव्या तेजस्वी रुपात साकारला जाणार आहे. या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळा अनुभवण्यासाठी शहरवासियांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा आहे. म्हणूनच, मातृभूमीच्या रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा देणार हा कार्यक्रम पालकांनी आवर्जून आपल्या पाल्यांना हा कार्यक्रम दाखवावा.
- inspirational event, city residents, digital lighting show, history awareness, educational program
- Moshi, Borhadewadi, evening event, cultural heritage,
- heritage event, Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj, historical celebration
- इतिहासाचा सोहळा, शौर्य, त्याग, पराक्रम, प्रेरणादायी कार्यक्रम, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी
- हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, डिजिटल मॅपिंग, विद्युत रोषणाई,
- छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तेजोमय जागर
- मोशी, बोऱ्हाडेवाडी