news
clock
चिखलीत अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी युवकाला अटक

चिखलीत अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी युवकाला अटक

चिखलीत अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी युवकाला अटक

पिंपरी, ता. २७ - चिखली परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ही कारवाई बुधवारी (ता. २५) रात्री सुमारे ८.२५ वाजण्याच्या सुमारास मोरे वस्ती-चिखली येथील रोहित गॅस सर्व्हीसमध्ये करण्यात आली. आरोपी रोहित प्रभाकर शिंदे (वय २७, रा. मोरेवस्ती, चिंचेचा मळा, चिखली) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरमधून नोझलच्या सहाय्याने अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करत असल्याचे उघड झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता ज्वलनशील पदार्थ हाताळत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला होता. या ठिकाणी गॅसचा साठा करुन विक्रीही केली जात होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये लहान-मोठे गॅस सिलेंडर (भरलेले व रिकामे), वजन काटा आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे नोझल यांचा समावेश आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories